जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकासह पाच शिक्षक निलंबित.
नांदेड जिल्हा परिषदेच्या कौठा येथील प्राथमिक शाळेत शालेय अनुदान, गणवेश अनुदान, विना आधार कार्ड प्रवेशित विद्यार्थी, बोगस अपंग शिक्षक आदी प्रकरणाबाबत जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आले होते.
सदर आंदोलनाची दखल घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकसह पाच शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या बोगसगिरीच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संघरत्न गायकवाड यांनी आंदोलन केले होते, त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवालानंतर कवठा शाळेतील पदोन्नत मुख्याध्यापक आनंदराव जयंतराव मुंडे, जे जे एम राठोड, डि.जे.हराळे,के.एस.सोनकांबळे,बि.के.आडपवार,बिग.जी.बुड्ड त्या शिक्षकांचे निलंबनाचे आदेश काढले असून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या