Ad 3

शिक्षकांचे निलंबन रद्द करण्यात यावे याकरिता विद्यार्थी आणि पालकांचा थेट जिल्हा परिषदेला घेराव.

नवीन कौठा जिल्हा परिषद शाळेतील निलंबित शिक्षकांच्या समर्थनार्थ विद्यार्थी आणि पालकांचा नांदेड जिल्हा परिषदेला घेराव.

नांदेड:  नवीन कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या बोगसगिरीच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संघरत्न गायकवाड यांनी आंदोलन केले होते, त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीच्या अहवालानंतर कवठा शाळेतील पदोन्नत मुख्याध्यापक आनंदराव जयंतराव मुंडे, जे जे एम राठोड, डि.जे.हराळे, के.एस.सोनकांबळे, बि.के.आडपवार, बिग.जी.बुड्ड या सर्व शिक्षकांचे निलंबनाचे आदेश दिनांक ०७/१२/२०२२ रोजी काढण्यात आले होते. तसेच त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती.

      निलंबनाची बातमी गावातील पालकांना समजताच आपल्या पाल्यांना घेऊन शिक्षकांचे निलंबन रद्द करण्यात यावे याकरिता थेट नांदेड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. शिक्षणाधिकारी श्रीमती बिरगे मॅडम यांना घेराव घालून निलंबनाची कार्यवाही त्वरित मागे घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.विशेष म्हणजे आंदोलकांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता . इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ,महिला,विद्यार्थी पाहून संबंधित अधिकारी,पदाधिकारी,पत्रकार पण चक्रावले होते. ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ऐन थंडीत अधिकाऱ्यांना घाम फुटला होता. प्रामाणिक शिक्षकांवर चुकीची कार्यवाही कराल तर काय होऊ शकतो याची प्रचिती कालच्या घटनेवरून संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आला आहे.  

    उपस्थित महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले कि सदर शिक्षकांची तक्रार हे राजकीय व वैयक्तिक द्वेषा पोटी करण्यात आली आहे. सर्व शिक्षक हे प्रामाणिक कार्य करणारे आहेत. विनाकारण प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना नाहक त्रास देण्यासाठी तथाकथित व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या मार्फत हि खोटी तक्रार करण्यात आली आहे. नवीन कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत गोर- गरिबांचे मुले शिकतात.ह्या विद्यार्थ्यांना आमचे गुरुजी प्रामाणिकपणे शिकवतात.तसेच स्वखर्चातून आमच्या मुलांना गुरुजींनी वेळोवेळी मदत केली आहे त्यामुळे लवकरात लवकर आमच्या गुरुजींचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी भूमिका सर्व महिलांनी घेतली आहे.

        उपस्थित विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षकांच्या समर्थनार्थ "आमचे सर आम्हाला हवेच" अशी जोरदार  घोषणाबाजी करून जिल्हा परिषद दणाणून सोडले.बऱ्याच चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले होते. आमचे सर आमच्या शाळेत हवेच अशी भूमिका उपस्थित चिमुकल्यांची होती.

शिक्षणाधिकारी बिरगे मॅडम यांना जाब विचारताना महिला पालक यांचा व्हिडिओ   .


  प्रामाणिकपणे अध्यापनाचे कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांच्या पाठीमागे पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी  खंबीरपणे उभे असतात हे कालच्या नांदेड जिल्हा परिषदेतील घटनेवरून दिसून येते.म्हणून शिक्षक मित्रांनो गावातील काही उपद्रवी समाजकंटक,राजकीय व्यकी,पत्रकार,मुजोर अधिकारी तुम्हाला वैयक्तिक द्वेषापोटी,आर्थिक लोभापायी कितीही  मानसिक  त्रास देत असतील,वरिष्ठांकडे खोटी तक्रार करत असतील तरी तुम्ही न डगमगता ,तुम्ही तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत चला.प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या मागे समाज नेहमी खंबीरपणे उभा असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कालची नांदेड जिल्हा परिषदेतील घटना. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code