Ad 3

TAIT 2023 परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके यांची सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिक वरती.

TAIT 2023 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची  अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके   .
      
  CTET 2022  परीक्षेस प्रविष्ठ  झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक भर्तीसाठीची TAIT परीक्षा देता यावी यासाठी अर्ज करण्याची मुदत 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अजूनही ज्या डी. एड व बी.एड पात्र विद्यार्थ्यांनी TAIT  परीक्षेसाठी अर्ज केले नसतील त्यांनी आपले अर्ज तात्काळ सादर करावेत.
        
 या परीक्षेसाठी पहिली ते बारावी वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी समान अभ्यासक्रम आहे. सदर लेखात TAIT परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धती यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.

  •      TAIT 2023 परीक्षा शुल्क


1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये
2.मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक /अनाथ / दिव्यांग उमेदवार - 850 रुपये

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
    X
    ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
    आकारमान 200X300 pixels
    फाईल साईज 20 kb50kb –
  • (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
    आकारमान 140X60 pixels
    फाईल साईज 10kb 20kb
  • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
    आकारमान 240X240 pixels in 200 DPI
    फाईल साईज 20 kb 50kb
  • (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
    आकारमान 800×400 pixels in 200 DPI
    फाईल साईज 50kb-100kb –
  • स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना

        या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी  असलेले शिक्षक पाञ आहेत.  

  • १ ली ते ८ वी  इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी -डी.एड + टीईटी पेपर एक उत्तीर्ण/अपिअर   
  • 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ टीईटी पेपर दोन उत्तीर्ण /अँपिअर          
       तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड.  असलेले शिक्षक पात्र आहेत.
 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत.
 9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.
          *प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.*
         *परीक्षेसाठी इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम असून अर्ज भरतांना माध्यमाची निवड करावयाची आहे.*

 TAIT अभ्यासक्रम - प्रस्तुत परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता(120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी(80 गुण)अशा दोन विभागात आहे.
  
TAIT 2023 अभ्यासक्रम व  महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

■ TAIT संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी उपयुक्त संदर्भ
१. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर
२. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते
   
■ TAIT अभ्यासक्रम घटकनिहाय महत्वपूर्ण संदर्भ

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व इत्यादी घटक - अंदाजे 30-35 गुण*

★ संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र -  डॉ शशिकांत अन्नदाते सर (मानसशास्त्र अत्यंत उपयुक्त संदर्भ)
★ शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

★ बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)- सचिन ढवळे/के'सागर/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी

★अंकगणित (अंदाजे 30 - 35 गुण) सचिन ढवळे/प्नितीन महाले/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे

★ मराठी (अंदाजे 15 -20 गुण) - मो.रा.वाळिंबे/के सागर/ बाळासाहेब शिंदे

★इंग्रजी (अंदाजे 15 -20 गुण) - के सागर/ बाळासाहेब शिंदे

★ सामान्यज्ञान (अंदाजे 15 - 20 गुण) के'सागर/ विनायक घायाळ/नवनीत 

★ TAIT मागील प्रश्नपत्रिकेसाठी विनायक घायाळ / मागील प्रश्नपत्रिका असलेले कोणतेही पुस्तक

★ TAIT प्रश्नपत्रिका सरावासाठी के'सागर प्रकाशन स्वाती अन्नदाते यांचे "TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

         *परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी महाशिक्षक पोर्टल कडून हार्दिक शुभेच्छा.
         

हा लेख आवडला असेल शेअर करायला विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code