Ad 3

राज्य सरकारी कर्मचार्यांना माहे जून २०२२ च्या वेतनासोबत मिळणार सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता .

राज्य सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्यांना माहे जून २०२२ च्या वेतनासोबत सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार ९ मे २०२२ चा शासन निर्णय.

.

शासन अधिसूचना वित्त विभाग दि .३० जानेवारी,२०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील पाच वर्षात,५ समान हफ्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा पारिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ सामान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३०,मे २०१९ अन्वये सूचना निर्गमित केल्या आहेत. 

राज्यात कोविड -१९ या विषाणूच्या साथीमुळे उद्धभवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग,दि . जून २०२१ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दि. १ जुलै २०२० रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे.तसेच याच शासन निर्णयान्वये  दिनांक,१ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान स्थगित ठेवण्यात येऊन,थकबाकीचा तिसरा हप्ता अदा  करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला होता.

शासन आता असा आदेश देत आहे कि राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै २०२१ रोजी देय  असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतन थकबाकी तिसऱ्या हप्त्याची रक्कम सर्व पात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या  माहे जून २०२२ च्या वेतनासोबत  अदा  करण्यात यावे. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code