राज्यातील शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याबाबत मा.प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक ५ मे २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती .
सदर बैठकीमध्ये शिक्षकांचे पगार वेळेत होण्यासाठी काही सूचना देण्यात आले आहेत. त्यापैकी एक महत्वाची सूचना,जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शिक्षकांचे वेतन देयक कोषागार कार्यालयातून पारित झाल्यानंतर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा होते. त्यानंतर सदर रक्कम गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्याध्यापकांच्या संयुक्त खात्यावर जमा केली जाते व त्यानंतर शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होते.
सदर प्रक्रियेस लागणाऱ्या कालावधीमुळे वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर प्रत्यक्ष जमा होण्यास विलंब होत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्हा परिषदेमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडून ZPFMS प्रणालीद्वारे शिक्षकांच्या खात्यावर थेट वेतनाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
याबाबत प्रधान सचिव वित्त विभाग यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी देखील शिक्षकांचे वेतन याच धर्तीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून ZPFMS ऑनलाईन प्रणालीद्वारे थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.



0 टिप्पण्या