Ad 3

संवर्ग ४ मधील बदली प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ?

 संवर्ग ४ मधील बदली प्राप्त शिक्षक ऑनलाईन  प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आजपासून सुरु .

 दिनांक 21 जानेवारी 2023  ते दिनांक 24 जानेवारी 2023 पर्यंत ही सुविधा बदली पात्र शिक्षकांसाठी उपलब्ध राहील.

 

बदली पोर्टल वरती ऑनलाईन प्राधान्यक्रम  भरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी ?

  • बदली पोर्टल वरती प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता प्रथम लॉगीन करून रिक्त पदांची यादी डाउनलोड करा.
  • तसेच बदली पात्र शिक्षकांची रिक्त पदांची यादी सुद्धा डाउनलोड करा.
  • सदर दोन्ही यादींचे  काळजीपूर्वक अभ्यास  करा.
  •  सेवाजेष्ठतेनुसार आपल्या सोयीची हवी असलेली शाळा कोणती मिळू शकते याचा अंदाज बांधा. 
  •  सदर शाळांचे  प्राधान्यक्रम यु-डायस क्रमांक सह  नोंदून ठेवा .
  • त्यानंतर बदली पोर्टल वरती लॉगीन करून निवडलेल्या  शाळांचा पसंती क्रमानुसार शाळा ऍड करा. 
  • पहिल्याच दिवशी फॉर्म सबमिट  करायची घाई करू नका. योग्य ते वेळ घेऊन,अभ्यास करून विन्सस ने दिलेल्या सूचना व शासन निर्णय  यांचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टल वरती भरून फॉर्म सबमिट करा. 
  •  फॉर्म सबमिट करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. 
बदलीपात्र शिक्षकांनी पसंतीक्रम कसा भरावा ?



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code