Ad 3

रिक्त पदांवर बदली मागण्याचा नाही अधिकार !म्हणे बदली अधिकार प्राप्त शिक्षक ?

 रिक्त पदांवर बदली मागण्याचा नाही अधिकार !म्हणे बदली अधिकार प्राप्त शिक्षक ?

कोरोनामुळे विलंब झालेल्या बहुप्रतीक्षित शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया यंदा होत आहेत. या बदली प्रक्रीयेअंतर्गत एकूण 4 संवर्ग बनवण्यात आले आहेत.नुकतेच संवर्ग 1 संवर्ग 2 यांची बदली प्रक्रिया पुर्ण झाली आहे.

    संवर्ग एक मध्ये विविध आजाराने ग्रस्त शिक्षक आणि 53 वर्षावरील जेष्ठ शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.यांना शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमानुसार बदली प्रथम प्राधान्याने घेता येते.


  संवर्ग दोन मध्ये जे पती-पत्नी तीस किलोमीटर अंतरापेक्षा लांब अंतरावर नोकरी करत आहेत त्यांचा समावेश होतो.त्यांना बदली प्राधान्याने सर्व रिक्त जागा व बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली मागता येते.

    जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अडचणीतील शाळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करून तसेच तेथील शिक्षकांना संबंधित शाळेवर तीन वर्षे सेवा पूर्ण झाली असेल तर बदली घेता येते अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हटले जाते.10 जानेवारी २०२३ पासून संवर्ग 3 मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.संबंधित पोर्टल वर जाऊन अर्ज भरताना शिक्षकांना रिक्त पदांवर बदली मागण्याचा अधिकार नाही. 

  बदलीपात्र शिक्षकांच्या जागा संवर्ग 1 ने घेतल्याने त्या जागा सुद्धा उपलब्ध नाहीत, रिक्त जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतांना त्या दाखवत नाही.बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला निव्वळ रिक्त पदावर बदली मागता येत नाही.तसेच अर्ज भरताना आपल्याला हव्या त्या सोयीच्या दोन चार जागा भरण्याचा ही अधिकार नाही उरलेला नाही.अर्ज भरताना सर्वच्या सर्व 30 पर्याय द्यावे लागतात म्हणजेच ३० शाळा निवडावेच लागणार आहेत.30 पर्याय भरणे म्हणजे आगीशी खेळल्यासारखे आहे.त्यामुळे बरेच शिक्षक बदलीसाठी इच्छुक असून सुद्धा 30 पर्याय निवडायच्या अटीमुळे बदलीसाठी फॉर्म  भरण्याचे धाडस करत नाही आहेत.

  काही जिल्ह्यांमध्ये संवर्ग 3 करिता अगदी बोटावर मोजण्याइतकेच बदलीपात्र जागा आहेत.अमरावती जिल्ह्यात तर एक बदलीपात्र आणि १०७७ बदली अधिकार प्राप्त आहेत.तर गोंदिया जिल्ह्यात बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या 149 असून त्यांना फक्त 45 जागा उपलब्ध आहेत, त्यातही गोंदिया तालुक्यात एकही जागा उपलब्ध नाही.

   समानीकरणाच्या धोरणाने अगोदरच खूप कमी निवडीची संधी राहिली होती.त्यात निव्वळ रिक्त पदेही संवर्ग तीन मधील शिक्षकाला दाखवली गेली नसल्याने अवघड क्षेत्रातील शिक्षकांचे खरेच अवघड झाले आहे.राज्यस्तरीय संघटनेचे नेते सोयीस्कर भूमिका घेवून नेहमी प्रमाणे वेळकाढूपणा करत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये असंतोष असून या अन्यायकारक बदलीविरोधात अवघड क्षेत्रातील शिक्षक एकत्र येऊन न्यायालयात न्याय मागण्याचा विचार करत आहेत.

  नवीन बदली प्रक्रियेमुळे अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची गोची झाली आहे.सध्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीप्रक्रियेत दुर्गम भागातील शिक्षकांवर सरळ सरळ अन्यायच झालेला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code