Ad 3

दिव्यांग खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ५२ शिक्षकांचे अखेर निलंबन! मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दणक्याने शिक्षकांमध्ये खळबळ.

 दिव्यांग खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ५२ शिक्षकांचे अखेर निलंबन! मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दणक्याने शिक्षकांमध्ये खळबळ.

सोयीच्या ठिकाणीच नोकरी करता यावी, बदली होवू नये म्हणून दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या बीड जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.इतकेच नाही तर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रा आधारे त्यांनी शासनाकडून वाहन खरेदी,आयकर सूट असे अनेक लाभ देखील घेतले आहेत.



   बीड  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवारांनी केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील २४८ पैकी ५२ शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पवारांनी या ५२ शिक्षकांना निलंबित करत झटका दिला आहे. विशेष म्हणजे हे निलंबित सर्व शिक्षक खुल्या प्रवर्गातून  नोकरीला लागले होते.शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या शासकीय लाभांची  वसुली तसेच बडतर्फिची कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान पवार यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

    जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे होणाऱ्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात १५७२ शिक्षक पात्र होते. यातील ७९४ शिक्षकांनी आपण संवर्ग एक मध्ये असल्याबाबतचे अर्ज केले होते. संवर्ग एक म्हणजे गंभीर आजार दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे. आपली बदली होऊ नये किंवा हवी ती शाळा मिळावी यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि अनेक तक्रारी सीईओ अजित पवार यांना प्राप्त झाल्या होत्या.

   जवळपास 336 दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस देऊन त्यांची जिल्हा परिषदेत  14 डिसेंबर रोजी तपासणी करण्यात आले होते. सदर तपासणी मध्ये पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुनर्तपासणी आवश्यक असल्याचे मत नोंदविले.

    ३३६ शिक्षकांचे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय पुनर्तपासणी करण्यात आले. १४८ शिक्षकांचे अहवाल आजपर्यत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत.त्यापैकी  52 शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालात बोगस असल्याचे स्पष्ट झाले. अहवाल प्राप्त होताच सीईओ अजित पवार यांनी सदर ५२ शिक्षकांचे तडकाफडकी निलंबिन केले आहे.काही शिक्षकांचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत.त्यानंतर निलंबीतांची संख्या अजून वाढणार आहे.

 

निलंबित शिक्षकांमध्ये खालील शिक्षकांचा समावेश आहे. 

  1. धनंजय गोविंदराव फड (अंबाजोगाई, अल्पदृष्टी)
  2. रविकांत सुधाकर खेपकर (अंबाजोगाई, अस्तिव्यंग) 
  3. अशोक वामनराव यादव (अंबाजोगाई, अस्तिव्यंग)
  4.  चिंतामन तुकाराम मुंडे (अंबाजोगाई, अस्तिव्यंग)
  5. राजू शंकर काळे (आष्टी, कर्णबधीर)
  6. वर्षा रामकिसन पोकळे (आष्टी, कर्णबधीर),  
  7. राजेंद्र शिवाजी हजारे (आष्टी, कर्णबधीर)
  8. अमोल कुंडलिक शिंदे (आष्टी, अल्पदृष्टी)
  9. आनंद सिताराम थोरवे (आष्टी,अस्तिव्यंग)
  10. मनिषा उत्तमराव धोंडे (आष्टी, अस्तिव्यंग)
  11. देविदास भानूदास नागरगोजे (केज अल्पदृष्टी) 
  12.  आसाराम पांडूरंग धेंडूळे (गेवराई, अल्पदृष्टी) 
  13. रमेश ज्ञानोबा गधे (गेवराई, अल्पदृष्टी) 
  14. हनुमान यशवंत सरवदे (गेवराई, अल्पदृष्टी) 
  15. सुधाकर दगडू राऊत (गेवराई, अस्तिव्यंग) 
  16.   अरूण भिमराव चौधरी ( गेवराई, अस्तिव्यंग) 
  17. महादेव सखाराम जाधव (गेवराई,अस्तिव्यंग) 
  18.  मनोजकुमार अशोक जोशी (गेवराई, अस्तिव्यंग) 
  19. मनोजकुमार मधुकर सावंत (गेवराई, अस्तिव्यंग) 
  20. अनिता गोविंदराव यादव (गेवराई, अस्तिव्यंग) 
  21. अर्चना भगवान इंगळे (धारूर,अस्तिव्यंग) 
  22. शांताराम भानूदास केंद्रे (परळी,अल्पदृष्टी) 
  23. मनोज नरसिंगराव सुर्यवंशी (परळी अल्पदृष्टी) 
  24.  दिपक भालचंद्र शेप (परळी, अल्पदृष्टी) 
  25. जानदेव नवनाथ मुटकुळे (पाटोदा, अल्पदृष्टी) 
  26.  गणेश भागवत ढाकणे (पाटोदा अल्पदृष्टी) 
  27.  पांडूरंग आबासाहेब गवते (बीड, कर्णबधीर) 
  28. शितल शहादेव नागरगोजे (बीड,कर्णबधीर) 
  29.  स्वाती चंद्रसेन शिंदे (बीड,कर्णबधीर) 
  30. भारती मुरलीधर गुजर (बीड कर्णबधीर) 
  31. अंबिका बळीराम बागडे (बीड , कर्णबधीर) 
  32. विमल नामदेव ढगे (बीड, कर्णबधीर) 
  33. जिवन रावसाहेब बागलाने (बीड, कर्णबधीर) 
  34. शोभा अंबादास काकडे (बीड, कर्णबधीर) 
  35. वनमाला देविदास इप्पर (बीड, कर्णबधीर) 
  36. आश्रूबा विश्‍वनाथ भोसले (बीड, अल्पदृष्टी) 
  37.  राजश्री रघुवीर गावंडे (बीड, अल्पदृष्टी) 
  38. वाजेदा तबसुसुम मोहम्मद शफीउद्दीन (बीड, अल्पदृष्टी) 
  39. शैला नागनाथ शिंदे (बीड, अल्पदृष्टी) 
  40.  रतन अंबादास बहिर (बीड,अल्पदृष्टी) 
  41.  दतू लक्ष्मण वारे (बीड, अस्थिव्यंग) 
  42.  बंडू किसनराव काळे (बीड,अस्तिव्यंग) 
  43. चाँद पाशा महेबूब शेख (बीड, अस्तिव्यंग) 
  44. उज्वला अशोक जटाळ (बीड, अस्तिव्यंग) 
  45. आयशा सिद्दीका इनामदार (बीड, अस्तिव्यंग) 
  46. ज्योती लहूराव मुळूक (बीड, अस्तिव्यंग) 
  47. अंजली प्रभाकर भोसले (बीड, अस्तिव्यंग) 
  48. गोविंद अंकुश वायकर (बीड, अस्तिव्यंग) 
  49. शेख समिना बेगम शेख हमीद (बीड, अस्तिव्यंग) 
  50. बाळू उमाजी सुरासे (शिरूर, अल्पदृष्टी) 
  51.  
  52.  
यांचा समावेश आहे. दरम्यान सीईओ अजित पवार यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हतील बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
 

देशभक्ती गीत Download & Play

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code