Ad 3

नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू होणार एक राज्य,एक गणवेश योजना.

  नवीन शैक्षणिक वर्षापासून  लागू होणार एक राज्य,एक गणवेश योजना. 

 येणाऱ्या नवीन शैक्षणिक (२०२३-२४)वर्षांपासून  राज्य सरकार 'एक राज्य एक गणवेश योजना' राबविण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत सर्व सरकारी शाळांना लागू असेल . या योजनेमुळे २५ हजार सरकारी  शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील.
 येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांपासून (२०२३-२४) राज्य सरकार 'एक राज्य एक गणवेश योजना' राबविण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत सर्व सरकारी शाळांना लागू असेल . या योजनेमुळे २५ हजार सरकारी  शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. 

   काही शाळांनी कपड्याची आर्डर दिल्यामुळे अशा शाळांमध्ये शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार, आणि बुधवार असे  आठवड्यातून तीन दिवस परिधान करतील ,तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार,शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील.यासाठी शासनाला वार्षिक ३८५ कोटी रुपयाचा खर्च येणार आहे.लवकरच गणवेशासाठी निविदा काढल्या जातील असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

गणवेश कसा असेल?

      मुलांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची  पॅण्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल.शाळांमध्ये सलवार-कमीज असेल तर सलवार गडद निळे आणि  कमीज आकाशी रंगाचा असेल.मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे .

    सर्व शासकीय शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासोबत बूट-मोजेही देण्याचा शासनाचा विचार आहे . 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code