Ad 3

पानशेत पॅटर्न "क्लस्टर स्कुल " राज्यभर राबविले जाणार ?

पानशेत पॅटर्न "क्लस्टर स्कुल " राज्यभर राबविले  जाणार ?

कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे  लवकरच होणार एकत्रीकरण. 

 कमी पटाच्या शाळा बंद नव्हे, तर त्यांचे एकत्रीकरण करायचे, असा हा नवा पर्याय आहे. यालाच क्लस्टर स्कूल (समूह शाळा) असे नाव दिले आहे. यानुसार झेडपीची राज्यातील पहिली क्लस्टर स्कूल ही पुणे जिल्ह्यातील पानशेत (ता. वेल्हे) येथे साकारत आहे. शाळा एकत्रीकरणाचा  हा राज्यातील पहिलाच प्रयोग असणार आहे.


    पानशेत मध्ये केलेल्या १३ शाळांच्या एकत्रीकरणाचा  पॅटर्न आता राज्यभरात राबविले  जाणार आहे याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लोणावळा येथे झालेल्या परीक्षेमध्ये ही घोषणा केली आहे. 

   पुणे जिल्हा परिषदेकडून  गेल्या महिन्यात निपुण भारत या उपक्रमाअंतर्गत  सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी व गणित या विषयातील ज्ञान तपासण्यात आले, त्यात छोट्या शाळांमधील तिन्ही वर्गातील ६५ ते ७० टक्के विद्यार्थी हे सामान्य अर्थात पहिल्या पातळीवर असल्याचे दिसून आले  तर उर्वरित विद्यार्थी हे दुसऱ्या स्तरावर होते.


     पुणे जिल्हा परिषदेकडून  गेल्या महिन्यात निपुण भारत या उपक्रमाअंतर्गत  सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी व गणित या विषयातील ज्ञान तपासण्यात आले,त्यात छोट्या शाळांमधील तिन्ही वर्गातील ६५ ते ७० टक्के विद्यार्थी हे सामान्य अर्थात पहिल्या पातळीवर असल्याचे दिसून आले  तर उर्वरित विद्यार्थी हे दुसऱ्या स्तरावर होते.

   याउलट जास्त  पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ६० ते ७५  टक्के विद्यार्थी हे दुसऱ्या व तिसऱ्या म्हणजेच वरच्या स्तरावर असल्याचे आढळले. या सर्वेक्षणावरून मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आकलन क्षमता चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पानशेत पॅटर्न नेमका कसा आहे?

  • पुणे जिल्हा परिषदेकडून  पानशेत येथील जि .प.शाळेत या परिसरातील अनेक कमी पटसंख्या असलेल्या बारा शाळांचे समायोजन करण्यात आले.

  • पानशेत येथील जिल्हा परिषद शाळेत  पटसंख्या ९२ इतकी होती तर शिक्षकांची संख्या ५ होती. कमी पटसंख्या असलेल्या त्या १२ शाळांमध्ये एकूण २७ शिक्षक कार्यरत होते.
 
  • एकत्रीकरणानंतर पानशेत शाळेत विद्यार्थी संख्या ही २१०  इतकी झाली असून या शाळेत १० शिक्षक आणि ०१  मुख्याध्यापक अशी रचना करण्यात आली आहे.

  • एकत्रिकरणानंतर यंदापासून प्रथमच पूर्ण क्षमतेने जिल्हा परिषद पानशेत शाळा सुरू होणार आहे. तसेच या तेरा शाळांमधून शिक्षकांना महिन्याला वेतनापोटी सुमारे 31 लाख रुपये द्यावे लागत होती आता हीच रक्कम अकरा ते बारा लाखांवर येणार आहे.

  • पानशेत मध्ये पूर्वीच्या बारा शाळांत कार्यरत असणारे २७  शिक्षक कमी होऊन ही संख्या ११  वर आली आहे. त्यामुळे उर्वरित १६ शिक्षकांना अन्य ठिकाणी कमतरता असलेल्या शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.

  • एकत्रीकरणामुळे पूर्वीच्या तेरा शाळांवर होणारा खर्च आता केवळ एका शाळेवरच खर्च केला जाणार आहे.या  १३ शाळेंतील शिक्षकांच्या वेतनापोटी महिन्याला सुमारे ३२ ते ३३  लाख रुपये  खर्च होत होते,आता हीच रक्कम ११ ते १२ लाखांवर येणार आहे. 


  • क्लस्टर स्कूलसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ८ प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रत्येक वर्गात संगणक, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रयोगशाळा व एक ई वर्गखोली तयार कऱण्यात आलेली आहे. इमारतीत आणखी चार खोल्या असणार आहेत. अशी एकूण बारा वर्गखोल्यांची ही नवी आदर्श शाळा असणार आहे. 

  • पानशेतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेणार आहेत. यासाठी आजूबाजूच्या गावातून शाळेत येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारी निधीच्या माध्यमातून बसची सोय उपलब्ध करून देणारी पानशेत ही राज्यातील एकमेव शाळा ठरणार आहे. यासाठी फोर्स मोटर्सने दोन बस दिल्या आहेत. त्यातील एक बस जिल्हा परिषदेच्या मालकीची असेल, तर दुसरी बस स्थानिक चालकाला चालविण्यासाठी दिली जाणार आहे.


जि .प.शाळा पानशेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code