Ad 3

केंद्रप्रमुख पदाची परीक्षा घेणार IBPS; परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर.

 

केंद्रप्रमुख पदाची परीक्षा घेणार IBPS;  परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर. | IBPS to conduct exam for kendra Pramukh post; Probable date of exam announced.

 मा.मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये IBPS प्रणाली अंतर्गत केंद्रप्रमुख पदाची  परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.परीक्षा १७ जून रोजी घेण्याचे प्रस्तावित असले बाबत मिटिंगमध्ये सांगण्यात आले.

  १७ जून रोजी परीक्षा घेऊन  परीक्षेचा निकाल २५ जून च्या दरम्यान जाहीर करण्यात यावे. तसेच ३० जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण  करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करावी अशा पद्धतीच्या सूचना मिटिंग मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

केंद्रप्रमुख (kendrapramukh bharti) या पदांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया लवकरच IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया अगदी सोप्या प्रकारे असणार आहे.

केंद्रप्रमुख पदाची भरती ,अभ्यासक्रम,GR (शासन निर्णय) इतर सर्व माहिती

   IBPS चा फुल फॉर्म इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute Of Banking Personal Selection) असा होतो. बँकेचे महत्वपूर्ण पदांसाठी IBPS परीक्षा घेतली जात असते. IBPS परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य देण्याचे काम आणि चांगलं पद देण्याचे काम ही परीक्षा करत असते. की IBPS ही एक विश्वसनीय संस्था आहे जी अनेक वर्षांपासून परीक्षांचे आयोजन करत आहे.आता लवकरच शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख भरती परीक्षाचे आयोजन IBPS करणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code