महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट :
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर केले असून, महाराष्ट्रातील चार शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट योगदानामुळे हा प्रतिष्ठित सन्मान प्राप्त केला आहे. शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील या शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, संशोधन आणि सामाजिक योगदानाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली आहे. हा पुरस्कार ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभाग
- डॉ. शेख मोहम्मद वकुओद्दीन शेख हमीदोद्दीन – जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धपूर, नांदेड
- डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे – दयानंद कॉलेज ऑफ आर्ट, लातूर
उच्च शिक्षण विभाग
- डॉ. नीलाक्षी जैन – शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई
- प्रा. पुरुषोत्तम पवार – एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, बारामती
.
ठळक मुद्दे
- देशभरातील 66 शिक्षकांची निवड (शालेय शिक्षण 45, उच्च शिक्षण 21).
- महाराष्ट्रातून एकूण 4 शिक्षकांचा सन्मान.
- निवड प्रक्रिया जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारदर्शक पद्धतीने झाली.


0 टिप्पण्या