प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन,लार्सन अँड टुब्रो,ब्लु स्टार तसेच समग्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये माझी ई- शाळा हे अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियाना चा प्रारंभ ठाणे,पालघर; उस्मानाबाद आणि रायगड या जिल्ह्यांपासून सुरू करण्यात येणार आहे.
सदर अभियान उद्घाटन सोहळा काल्हेर जिल्हा परिषद तालुका भिवंडी या शाळेमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री माननीय श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माननीय दीपक केसरकर यांनी शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले की राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षण हे मातृभाषेत होणे गरजेचे आहे. तसेच भारताला स्वयंपूर्ण बनविण्याकरता डिजिटल युक्त प्रशिक्षण आणि ई लर्निंग आवश्यक आहे.
माझी ई-शाळा अभियानाविषयी:-
माझी ही शाळा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट हे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देणे आहे.
या अभियानात शिक्षकांनी पारंपारिक शिक्षण पद्धती बरोबरच ई लर्निंग माध्यमांचा वापर करून शिक्षणाचा स्तर उंचावणे हा हेतू आहे.
माझी ई-शाळा हे अभियान शाळेतील शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांकरिता प्रभावीपणे राबवणे हा मानस आहे. सदर अभियानामुळे ग्रामीण भागातील डिजिटल शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना डिजिटल साधने उपलब्ध होतील,आणि समाजातील डिजिटल शिक्षणातील दूरी कमी करण्यास मदत होईल हा सकारात्मक दृष्टीकोनकोण आहे.
माझी ई- शाळा अभियानातील अभ्यासक्रम हा बालभारती इयत्ता पहिली ते दहावीच्या पाठ्यक्रमावर आधारित आहे.
माझी ई- शाळा कार्यक्रमाची अंमलबजावणी
सदर अभियान प्रथम इन्फोटेक फाउंडेशन द्वारा पुढील तीन वर्षाकरिता शाळांमध्ये राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हे अभियान तीन टप्प्यांमध्ये होणार असून एकूण 5000 शाळा व पाच लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
- सदर अभियानांतर्गत 'प्रथम इन्फोटेक फाउंडेशन' प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन आदर्श शाळांची निवड करणार आहे आणि तिथे डिजिटल क्लासरूम उभारणार आहे. या डिजिटल क्लासरूम चे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित शाळेकडे सुपुत्र करण्यात येईल.
- ज्या निवडक शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत, परंतु डिजिटल अभ्यासक्रमाचे मात्र अभाव आहे अशा शाळांमध्ये संपूर्ण डिजिटल अभ्यासक्रम संस्थेद्वारा पुरवण्यात येईल.
- संबंधित शालेय शिक्षकांना डिजिटल डिवाइस आणि अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा संतुलित वापर यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येईल.
- काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेले हे ई-शाळा अभियाननक्कीच कौतुकास्पद आहे.


0 टिप्पण्या