Ad 3

जिल्हा अंतर्गत बदली झालेले सर्व शिक्षक मे अखेरपर्यंत कार्यमुक्त होणार!शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण.

 

जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या सर्व  शिक्षकांची मे अखेरपर्यंत  कार्यमुक्ती  होणार.

 आजच्या शासन परिपत्रकानुसार सन २०१७ पासून शासना मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे ,आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे आणि समोरील जिल्हा परिषदेने त्यांना हजर करून घेणे क्रमप्राप्त आहे.अशा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यामुळे काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील

  तसेच विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता, ०१/०४/२०२३ ते३०/०४/२०२३ पर्यंत शिक्षकांच्या कर्यमुक्तीबाबतचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत.कोणत्याही परिस्थितीत दि.०१/०५/२०२३ ते दि.३१/०५/२०२३ या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक करण्याबाबतची कार्यवाही करावी.असा स्पष्ट  आदेश  सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे.

    आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकातील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.एकप्रकारे अशी तंबीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.याचा अर्थ असा आहे माहे मे अखेर सर्व आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती होणारच.त्यामुळे संबंधित शिक्षकांनी आपली बॅग तयार ठेवावी. आता लवकरच कार्यमुक्ती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

 सदर शासन निर्णयाच्या विस्तारित माहितीसाठी GR डाऊनलोड करा. 


 

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code