Ad 3

शासकीय आश्रमशाळेतील तासिका तत्वावरील शिक्षक होणार कायम !मंत्रिमंडळाचा निर्णय.


आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ तासिका तत्वावरील शिक्षक व  रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.


 

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दिनांक १३/१२/२०२२ रोजी पार पडली.सदर बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.त्यापैकी एक म्हणजे शासकीय आदिवासी आश्रम शाळेत वर्षानुवर्षे तासिका तत्वावर अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांची सेवा कायम करणारी.१ नोव्हेंबर २०२२ पासून कर्मचाऱ्यांची सेवा नियमित समजण्यात येईल.आजच्या निर्णयाचा एकूण १५८५ कर्मचाऱ्यांना(शिक्षक/शिक्षकेतर) याचा लाभ होणार आहे.मात्र शिक्षकांनी पाच वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य राहणार आहे.सदर निर्णयामुळे ६४ कोटी रुपयाचा अधिक भार शासनावर पडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code