आता टीसी नसली तरी शाळेत प्रवेश मिळणार शासनाचा निर्णय जाहीर.
शासनाचा निर्णय ; जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार.
राज्यातील कोणत्याही माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (टि.सी.) अभावी प्रवेश नाकारता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.
शिक्षणाचा हक्क अधिनियम (RTE) नुसार विद्यार्थ्यांस वर्गामध्ये प्रवेश घेण्याचा हक्क आहे, अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतूद आहे.
RtE नियमास अनुसरून जन्म तारखेचा दाखला पुरावा म्हणून गृहीत धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये शालेय प्रवेश देण्यात यावा असे शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय महापालिका नगरपालिका खाजगी अनुदानित कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येणाऱ्या, तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळ संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात, तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल तर अशा विद्यार्थ्यास शाळा सोडल्याचा दाखल्या अभावी प्रवेश नाकारला जाणार नाही. तर अशा विद्यार्थ्याला जन्म तारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्रह धरून प्रवेश द्यावाच लागेल.
टीसी चे कारण देत विद्यार्थ्यास प्रवेशापासून वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध व मुख्याध्यापकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्यांची सरल स्टुडण्ट पोर्टल वरील माहिती मिळवण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसाच्या हात विनंती एकसेप्ट करेल.
शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्रप्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावर मान्य करतील असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे.




0 टिप्पण्या