Ad 3

राज्यातील अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांशी जोडणार,५५ हजार अंगणवाड्यांचे नजीकच्या शाळेत विलीनीकरण.

राज्यातील अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडणार, ५५ हजार अंगणवाड्यांचे नजीकच्या शाळेत विलीनीकरण.

 पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ पासून राज्यातील अंगणवाड्या प्राथमिक शाळांची जोडल्या जाणार आहेत. अंगणवाडी मधील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.


    पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ५५ हजार अंगणवाडी केंद्रे जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेशी जोडण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे एक लाख अंगणवाड्यांमधून पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येत असून उर्वरित अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने प्राथमिक शाळांमध्ये विलीन होणार आहेत.
        महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने  शालेय शिक्षण विभाग हा उपक्रम राबवीत असल्याची माहिती समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.
    पूर्व प्राथमिक शिक्षणाला प्राथमिक शिक्षणाची जोडणी हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा भाग असून त्यानुसार हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एस.सी.ई आर.टी सध्या पूर्व प्राथमिक साठी अभ्यासक्रम तयार करीत आहे.
    अंगणवाडी मधील मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी शिक्षिकांना या अभ्यासक्रमाचे लवकरच प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
अंगणवाडीमध्ये शिकणारी मुले जेव्हा प्राथमिक शाळेत जातात त्यावेळी बरीच मुले घाबरलेली असतात. नवीन शाळेत जुळून घेण्यासाठी त्यांना दोन-तीन महिन्यांचा अवधी लागतो. अंगणवाड्यांच्या विलीनीकरणामुळे त्या मुलांना एकाच शाळेत जाण्याची सवय होईल आणि त्यांना कोणताही फरक जाणवणार नाही त्यासाठी हा उपक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून  महाराष्ट्रात राबवला जाणार आहे
.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code