राज्यातील शाळांमध्ये आता दररोज गायले जाणार राज्य गीत 'गर्जा महाराष्ट्र माझा'.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'गर्जा महाराष्ट्र' गीत दिनांक 19 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगी करण्यात येत आहे.
राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत परिपाठ प्रार्थना प्रतिज्ञा यासोबत राज्य गीत गर्जा महाराष्ट्र वाजविणे/गाणे १९ फेब्रुवारी पासून बंधनकारक असणार आहे.
राष्ट्रगीता बाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्य गीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे लागणार आहे. राज्य गीत वाजविताना किंवा गाताना योग्य तो सन्मान राखण्यात यावा असे स्पष्ट निर्देश शासन परिपत्रकात देण्यात आले आहे.
तसेच राज्यगीत सुरू असताना सावधान स्थितीत उभे राहावे व राज्य गीताचा सन्मान करावा. राष्ट्रगीतांप्रमाणे राज्य गीतालासुद्धा वेळेची मर्यादा असणार आहे. राज्य गीत सुमारे १.४१ मिनिटेच वाजविता/गाता येईल.
आता यंदापासून १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्य गीत वाजविले किंवा गायले जाणार आहे. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्य गीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
दोन चरणांसह खालील प्रमाणे
राज्य गीत म्हणून गर्जा महाराष्ट्र गीत एकरूप करण्यात आले आहे.त्या गीताचा
कालावधी सुमारे १.४१ मिनिटेअसणार आहे.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ||
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥२॥
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा



0 टिप्पण्या