Ad 3

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण 2023 24 साठी नाव नोंदणी सुरू.


 वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरू करणे साठी ची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता परिषदेमार्फत ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आलेली आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य प्राध्यापक यांनी नोंदणी करावयाची आहे.

प्रशिक्षणासाठी नोंदणी संकेतस्थळ
 
  सदर प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्यासाठी परिषदेच्या  https://training.scertmaha.ac.in  या संकेत स्थळास भेट द्यावे.

 प्रशिक्षण नोंदणी कालावधी

   प्रशिक्षण नोंदणी दिनांक 29मे,2023 पासून ते दिनांक  12 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.

प्रशिक्षणासाठी नोंदणी कोण करु शकतो?

  सदर प्रशिक्षणासाठी दिनांक 31 मार्च 2024 रोजी सेवेचे एकूण बारा वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच बारा वर्षे सेवा पूर्ण झालेली प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.


प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क किती?

सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रती प्रशिक्षणार्थी 2000 शुल्क ऑनलाइन अदा करावयाचे आहे.

अधिक माहितीसाठी खालील पत्रकाचे लक्षपूर्वक वाचन करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code