२०१४ मध्ये एका प्राथमिक शिक्षिकेने पाच आणि वर्षाच्या दोघा बहिणींना शिक्षा केली होती. कारण सदर पाच वर्षाची मुलगी तिच्या बाटलीतले पाणी संपले म्हणून शेजारील विद्यार्थ्यांच्या वॉटर बॅग मधील पाणी पीत होती. वर्गातील शिक्षिकेने ते पाहिले आणि सदर विद्यार्थिनीला हातावरती छडीने मारून शिक्षा केली.
कनिष्ठ न्यायालयाने एक दिवसाचा करावा आणि एक लाख रुपयाचा दंड ठोठावला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सदर शिक्षकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती भरत देशपांडे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली.
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी केलेली शिक्षा गुन्हा ठरवता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही शिक्षा कधी कठोरही होऊ शकते. विद्यार्थ्यांना केवळ औपचारिक शिक्षणाच्या उद्देशाने शाळेत दाखल केले जात नाही. शिस्तीसारखे पैलुही त्यात अंतर्भूत असतात. शिस्तप्रिय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि भविष्यात चांगले शिस्तबद्ध, सुसभ्य नागरिक तयार होतात.
शिक्षकांचा समाजामध्ये सर्वाधिक सन्मान केला जातो. ते आमच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत परंतु ते अशा आरोपांच्या दबावाखाली काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांना किरकोळ शिक्षाही करता येत नसेल तर शाळांना योग्य शिक्षण देण्याचे कार्य करणे अवघड होऊन बसले. समाजात लहान मुले आणि तरुण यांच्यावर शिस्तप्रिय संस्कार झाले पाहिजेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकमेकांचा आदर राखला पाहिजे कारण तेच देशाचे भवितव्य आहेत. असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदविले.
सदर शिक्षिकेला गोवा बाल न्यायालयाकडून
२०१९ मध्ये सुनावण्यात आलेली शिक्षा रद्द करण्यात आले.


0 टिप्पण्या