“ प्रशिक्षणार्थीवर भरते जि.प.शाळा, शिक्षक मात्र गायब — ५ शिक्षक निलंबित!
अमरावती : शनिवारी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिल्डा, एकटाई, खुटीदाह व हात्रू गावांना भेट देऊन ग्रामपंचायत तसेच शाळांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या शाळांमध्ये शिक्षक अनुपस्थित आढळले आणि केवळ युवा प्रशिक्षणार्थींच्या भरवश्यावर विद्यार्थ्यांचे शिक्षण चालत असल्याचे उघड झाले.
प्रशिक्षणार्थीवर शिक्षणाची जबाबदारी टाकून शिक्षक गैरहजर असणे तसेच निकृष्ट दर्जाचा मध्यान्ह भोजन व विद्यार्थ्यांचा अत्यंत कमी अध्ययनस्तर यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी कठोर पाऊल उचलले आहे.वर्गखोल्यांची दुरवस्था व शाळांचा दर्जा बघून त्या चक्क ‘भंगारगृहासारख्या’ दिसत असल्याची टिप्पणी मोहपात्रा यांनी केले .
तपासणीत एकटाईतील दोन, खुटीदाहमधील दोन व हिल्डा शाळेतील एक शिक्षक शाळेत आढळून आले नाहीत. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असून विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर अत्यंत खालावलेला असल्याचे आढळून आले. परिणामी संबंधित पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.


0 टिप्पण्या