Ad 3

शालेय पोषण अंतर्गत एमडीएम ॲप मध्ये विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थितीची नोंद होत नाही ! कारण?

PM-Poshan Update - पोर्टलवर दैनिक विद्यार्थी उपस्थिती नोंदणी बाबत अपडेट

➡️ गेल्या काही दिवसापासून शालेय पोषण आहार अंतर्गत एमडीएम ॲप मध्ये विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थितीची नोंद होत नाही त्याची कारणे

➡️ सद्यस्थितीत असलेली मध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलण्यात आलेले असून ते आता प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण झाले आहे.(PM-POSHAN ,,)

➡️ त्यामुळे एम डी एम ॲप वर  विद्यार्थी उपस्थितीची नोंदणी होत नसून वबसाईट बंद दाखवत आहे

➡️ नवीन शालेय पोषण आहार योजनेच्या वेबसाईटचे काम सुरु असल्याने ही समस्या येत आहे.

➡️ तसेच सद्यस्थितीतील एमडीएम ॲप सुद्धा बदलण्याची शक्यता आहे

➡️ यानंतर एमडीएम ॲप ऐवजी पीएम पोषण ॲप (PM- Poshan App) येऊ शकते.

➡️ तसेच यापूर्वी  राहिलेल्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार अंतर्गत उपस्थिती नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

➡️ त्यामुळे मुख्याध्यापकांनी चिंतेत न होता नवीन शालेय पोषण आहार अंतर्गत विकसित होणाऱ्या ॲप नंतरच माहिती नोंदवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code