प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आहारामध्ये प्रती विद्यार्थी अनुदानात वाढ.
शालेय पोषण आहारासाठी प्रति विद्यार्थी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार प्राथमिकसाठी ४ रुपये ९७ पैसे असलेले अनुदान आता ५ रुपये ४५ पैसे करण्यात आले असून, उच्च प्राथमिकसाठी ७ रुपये ४५ पैसे असलेले अनुदान ८ रुपये १७ पैसे करण्यात आले आहे.
सुधारित दरांनुसार प्राथमिकसाठी आहार खर्च ५ रुपये ४५ पैसे, धान्यादी पुरवण्यासाठी ३ रुपये ३७ पैसे, इंधन, भाजीपाला आदींसाठीचा २ रुपये ८ पैसे दर निश्चित करण्यात आला. तर उच्च प्राथमिकसाठी आहार खर्च ८ रुपये १७ पैसे, धान्यादी पुरवण्यासाठी ५ रुपये ६ पैसे, इंधन, भाजीपाला आदींसाठी ३ पैसे ११ पैसे अशा प्रकारे आहार खर्चाची विभागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या