Ad 3

शिक्षक बदलीप्रकरणी सर्व शिक्षक संघटनांनी व्यक्त केली नाराजी .

राज्यभरात बहुप्रतीक्षित जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रीयाचे बिगुल वाजले आहे.मात्र या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 आणि  संवर्ग 2 मध्ये शासन निर्णयानुसार बदली न करता नियुक्त केलेल्या कंपनीने वेगळ्याच अटी लादल्या आहेत.परिणामी शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून शासन निर्णयानुसारच बदली प्रक्रिया घ्यावी यासाठी शिक्षक संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार सुरु केला आहे .



    जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये नियुक्त कंपनीने संवर्ग एक आणि दोन साठी चुकीचे नियम लादल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.सध्याच्या शाळेत तीन वर्षे सेवा पूर्ण  झाली नसल्याने  बदलीसाठी होकार, नकार अर्ज  बऱ्याच संवर्ग १ आणि संवर्ग २ मधील शिक्षकांना ऑनलाइन अर्ज भारत आले नाही. 

      विशेष म्हणजे पती पत्नी एकत्रीकरणासाठी दोघांच्या नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर असू नये  असा नियम असून सुद्धा बदली अर्ज भरता आले नाही.कारण सध्याच्या  शाळेत बदली साठी तीन वर्षाची अट लादली आहे.यामुळे अनेक शिक्षक पती पत्नींना पुन्हा लांबच राहावे लागणार आहे. संवर्ग एक आणि दोन मधील शिक्षकांवर बदली पोर्टल च्या मनमानी कारभारामुळे एकप्रकारे  अन्याय  झालेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code