ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग-1 आणि विशेष संवर्ग भाग-2 संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहेत.अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या,तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो.शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत.बदली अर्जाची पडताळणी बाबतचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत.
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे आणि अशा शिक्षकांविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.याबाबतचे ग्राम विकास विभागाचे पत्र सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले आहे.


0 टिप्पण्या