जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी दि.07/04/2019 च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद दिनांक 07/04/2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमुद आहे. जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक 30 जून 2022 पर्यंत तीन वर्षे सलग सेवा झालेली आहे असे शिक्षक विशेष संवर्ग भाग एक आणि दोन अंतर्गत बदलीसाठी पात्र आहेत.


0 टिप्पण्या