बनावट कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेतलेली शिक्षिका निलंबित .
आंतरजिल्हा बदलीसाठी स्तनदामाता म्हणून बनावट शासकीय कागदपत्रे तयार करून
लाभ घेतल्याचे समोर आल्यामुळे अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा
आगर येथील श्रीमती प्रिया श्रीराम रंगारी शिक्षिकेस जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी सौरव कटियार यांनी २९ नोव्हेंबर रोजी निलंबित केले आहे.
सदर शिक्षिकेने आंतरजिल्हा बदलीने देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या समुपदेशामध्ये स्तनदामाता म्हणून लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून बनावट शासकीयकागदपत्रे तयार करून बदलीचा लाभ घेतला होता.
सदर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर खोटी माहिती सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे जि.प.सीईओ सौरभ कटियार यांनी या शिक्षिकेला निलंबित केले आहे. निलंबित काळात शिक्षिका प्रिया रंगारी यांचे मुख्यालय तेल्हारा राहणार आहे.



0 टिप्पण्या