PM SHREE योजनेत आपल्या शाळेचे नाव कसे नोंदवावे ?
केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पैकी एक योजना म्हणजे Prime Minister Schools for Rising India (Pm shri) योजना होय. मा.पंतप्रधान महोदय श्री.नरेंद्र मोदी यांनी 5/9/2022 रोजी PM SHRI योजनेचा शुभारंभ केला.या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करावयाची असून त्या माध्यमातून उत्कृष्ट भौतिक सुविधा,योग्य,संसाधने आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्टया अनुकूल वातावरण,उच्च गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक,विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत.
Pm shri योजनेसाठी प्राथमिकदृष्ट्या निवड झालेल्या शाळांची यादी जिल्हा नोडल अधिकारी यांना प्राप्त झाली आहे. शाळेची आणि शालेय शिक्षण विभागाची रूपरेषा बदलवणारी, शिक्षण क्षेत्राचे भविष्य बदलवणारी ही योजना होय.
PM SHREE योजनेत आपल्या शाळेचे नाव असल्यास नोंदणी कशी करावी या विषयी आपण माहिती पाहूया.
Pm shri schools Registration सर्वप्रथम नोंदणी करण्यासाठी पीएमश्री एज्युकशन च्या वेबसाईटवर जावे.
https://pmshrischools.education.gov.in
- Login for school user या ठिकाणी क्लिक करावे.
- आपल्या शाळेचा U-Dise नंबर प्रविष्ठ करावा तसेच खाली मुख्याध्यापकांचा मोबाईलनंबर टाइप करावा.मोबाईल नंबर U-Dise + शी जोडलेलाच असावा .Send OTP या वर क्लिक करावे.
- रजिष्टर मोबाईल वर आलेला OTP भरून घेतल्यानंतर आपण Pm shri schools योजनेच्या वेबसाईटमच्या entrance मध्ये प्रवेश करतो.
आपल्यासमोर सात विभागात विभागलेले 61 प्रश्न असलेला आणि 165 गुणांचे स्वयंमूल्यमापन असलेला फार्म दिसतो.
- यातील सर्व विभागातील प्रत्येक प्रश्नासमोर दोन पर्याय दिलेले आहेत. नाही व
होय असे ते दोन पर्याय असून होय लिहल्यास (म्हणजे उपलब्धता असल्यास)
आपल्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त होतात. तर नाही हा प्रतिसाद
नोंदवल्यावर 0 गुण प्राप्त होतात.
- यातील सर्व विभागातील प्रत्येक प्रश्नासमोर दोन पर्याय दिलेले आहेत. नाही व
होय असे ते दोन पर्याय असून होय लिहल्यास (म्हणजे उपलब्धता असल्यास)
आपल्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त होतात. तर नाही हा प्रतिसाद
नोंदवल्यावर 0 गुण प्राप्त होतात.
नोंदणी करण्यासाठी सरपंचाचे ना हरकत प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचे वचन पत्र, शाळेच्या दर्शनी भागाचा फोटो व शाळेच्या मागच्या भागाचा फोटो तसेच संपूर्ण 61 प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने दिलेली असावीत. अर्थात ही प्रश्नांची उत्तरे नाही /होय या स्वरूपाची आहेत.
मुख्याध्यापकांचे वचन पत्र डाउनलोड करा.
या पद्धतीने शाळेला समृद्ध करणाऱ्या, शाळेचे भविष्य उज्वल करणाऱ्या आणि इतर शाळा समोर आदर्श ठेवणाऱ्या Pm shri schools scheme मध्ये आपल्या आपल्या शाळेची नोंदणी करू शकता.









0 टिप्पण्या