Ad 3

आता ! महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आई -वडील किंवा सासू-सासरे यापैकी एक पर्याय निवडावे लागणार.

 वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यास आई-वडील किंवा सासू -सासरे यापैकी एक पर्याय निवडावे लागणार.


 दिनांक १४ डिसेंबर २०२२  रोजी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय परीपत्रकानुर आता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि त्यांच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई वडिलांची किंवा तिच्या सासू-सासर्‍यांची निवड करावी लागणार आहे.

सदर शासन निर्णयान्वये संबंधित विभागांना खालील आदेश देण्यात आलेले आहेत.

1. विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी तिचे आई-वडील किंवा सासू -सासरे  या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती चा लाभ घेण्यापूर्वी, त्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता निवड केली आहे. असे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालयास लेखी कळविणे बंधनकारक आहे.

 

2. उपरोक्त संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात अर्जाबाबत दिनांकसहित नोंद घेणे बंधनकारक आहे.

3. विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा लाभ घेण्याकरिता अर्ज दिले असेल, त्या दिनांक पासून केवळ पुढील कालावधीत संबंधितांनी (१) आई वडील किंवा (२)  सासू-सासरे या दोघांपैकी  घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येईल. म्हणजेच ज्या कालावधीमधील उपचार खर्चाच्या प्रतीपुर्तीची  मागणी शासकीय महिला कर्मचारी करीत आहे, त्या कालावधीत संबंधित सेवा पुस्तकावर सदर व्यक्तीची आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एक याची नोंद असणे आवश्यक आहे.

4. विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीत त्याच्यात कसलाही बदल करता येणार नाही.

अधिक माहितीसाठी परिपत्रक डाऊनलोड करा. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code