U-Dise Pluse मध्ये विद्यार्थी माहिती भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर जाणून घेऊया माहिती कशी भरायची.
यु-डायस प्लस प्रणालीत केंद्र शासनाकडून दोन टप्प्यांमध्ये माहिती संकलित करण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती तसेच शिक्षक माहिती आपण ऑनलाइन भरलेली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी माहिती संकलित करण्यात येणार आहे, त्यासाठी विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन (student Database Management System प्रणाली म्हणजेच SDMS Portal विकसित करण्यात आले आहे.
विद्यार्थी प्रोफाइल,नावनोंदणी,गळती, बदली,प्रगती/होल्डबॅक इत्यादी विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी विद्यार्थी डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे केंद्र,राज्य,जिल्हा,ब्लॉक आणि शाळा स्तरावर अहवाल तयार करण्यात मदत होणार आहे. .
Udiseplus मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरती आपण आपल्या शाळेची (विद्यार्थ्यांची) माहिती भरू शकता.
https://sdms.udiseplus.gov.in/#/login
विद्यार्थी माहिती दोन प्रकारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
१. पोर्टल वरती लॉगिन करून ऑनलाइन विद्यार्थ्यांची माहिती भरून .
२. एक्सल शीट अपलोड करून .
विद्यार्थी प्रोफाईल चे ५४ मुद्यांचा समावेश असलेला exel sheet डाउनलॊड करा.
विद्यार्थी प्रोफाइल मध्ये एकूण ५४ मुद्यांचा समावेश आहे. या ५४ मुद्यांसह आपणास प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. चला तर पाहूया U-dise Pluse मध्ये विद्यार्थी माहिती मोबाइल द्वारे कसे भरायचे.
प्रथम खालील लिंक वरती क्लिक करा.
https://sdms.udiseplus.gov.in/#/login
ब्राउर वरील उजव्या कोपऱ्यात थ्री डॉट्स वरती क्लिक करून desktop site view mode करा .




0 टिप्पण्या